गीताई अध्याय चवथा
श्री भगवान् म्हणाले
योग हा अविनाशी मी स्वये सूर्यीस बोलरिलो ।
मनूस बोलिला सूर्य तो इक्ष्वाकूस त्यापरी ॥ १ ॥
अशा परंपरेतूनि हा राजर्षीस लाभला ।
पुढे काळ-बळाने तो ह्या लोकी योग लोपला ॥ २ ॥
तो चि हा बोलिलो आज तुज योग पुरातन ।
जीवीचे गूज हे थोर तू हि भत सखा तसा ॥ ३ ॥
अर्जुन म्हणाला
ह्या काळचा तुझा जन्म सूर्याचा तो पुरातन ।
तू बोलिलास आरंभी हे मी जाणू कसे बरे ॥४ ॥
श्री भगवान् म्हणाले
माझे अनेक ह्यापूर्वी झाले जन्म तसे तुझे ।
जाणतो सगळे मी ते अर्जुना तू न जाणसी ॥ ५ ॥
असूनि हि अजन्मा मी निर्विकार जगत्-प्रभु ।
माझी प्रकृति वेठूनि मायेने जन्मतो जणू ॥ ६ ॥
गळूनि जातसे धर्म ज्या ज्या वेळेस अर्जुना ।
अधर्म उठतो भारी तेव्हा मी जन्म घेतसे ॥ ७ ॥
राखावया जगी संता दुष्टा दूर करावया |
स्थापावया पुन्हा धर्म जन्मतो मी युगी युगी ॥८ ॥
जन्म-कर्मे अशी दिव्य जो माझी नीट ओळखे ।
देह गेल्या पुन्हा जन्म न पावे भेटुनी मज ॥ ९ ॥
नाही तृष्णा भय क्रोध माझ्या सेवेत तन्मय ।
झाले ज्ञान-तपे चोख अनेक मज पावले ॥ १० ॥
भजती मज जे जैसे भजे तैसा चि त्यास मी ।
माझ्या मार्गास हे येती लोक कोणीकडूनि हि ॥ ११ ॥
जे कर्म-सिद्धि वांछूनि यजिती येथ दैवते ।
मनुष्य-लोकी कर्माचे पावती फळ शीघ्र ते ॥ १२ ॥
निर्मिल्रे वर्ण मी चारी गुण-कर्मे विभागुनी ।
करूनि सर्व हे जाण अकर्ता निविकार मी ॥ १३ ॥
कर्मे न बांधिती माते फळी इच्छा नसे मज ।
माझे स्वरूप हे जाणे तो कर्मात हि मोकळा ॥ १४ ॥
केली कर्मे मुमुक्षूंनी पूर्वी हे तत्त्व जाणुनी ।
तैसी तू हि करी कर्मे त्यांचा घेऊनि तो धडा ॥ १५ ॥
नेणती जाणते ते हि काय कर्म अकर्म हे ।
तुज ते सांगतो कर्म जाणूनि सुटशील जे ॥ १६ ॥
सामान्य कर्म जाणावे विकर्म हि विशेष जे ।
अकर्म ते हि जाणावे कर्माचे तत्त्व खोल हे ॥ १७ ॥
कर्मी अकर्म जो पाहे अकर्मी कर्म जो तसे ।
तो बुद्धिमंत लोकांत तो योगी कृत-कृत्य तो ॥ १८ ॥
उद्योग करितो सारे काम-संकल्प सोडुनी ।
ज्ञानाने जाळिली कर्मे म्हणती त्यास पंडित ॥ १९ ॥
नित्य-तृप्त निराधार न राखे फल-वासना |
गेला गढूनि कर्मात तरी काही करी चि ना ॥ २० ॥
संयमी सोडुनी सर्व इच्छेसह परिग्रह ।
शरीरे चि करी कर्म दोष त्यास न लागतो ॥ २१ ॥
मिळे ते चि करी गोड न जाणे दवंद्व मत्सर |
फळो जळो जया एक कररूने हि न बांधिला ॥ २२ ॥
जनात बैसली वृत्ति संग सोडूनि मोकळा ।
यज्ञार्थ करितो कर्म जाय सर्व जिर्राने ते ॥ २३ ॥
ब्रम्हात होमिले ब्रम्ह ब्रम्हाने ब्रम्ह लक्षुनी ।
ब्रम्ही मिसळले कर्म तेंव्हा ब्रम्ह चि पावला ॥ २४ ॥
देवताराधने यज्ञ योगी कोणी अनुष्टिती ।
ब्रम्हाग्नित तसे कोणी यज्ञे यज्त्व जाळिती ॥ २५ ॥
श्रोज्राठी इंद्रिये कोणी संयमाग्नीत अर्पिती ।
कोणी विषय शब्दादि इंद्रियाग्नीत अर्पिती ॥ २६ ॥
प्राणेंद्रिय-क्रिया कोणी सर्व होमूनि टाकिती ।
चिंतनाने समाधीस अंतरी चेतवूनिया ॥ २७ ॥
द्रव्ये जपे तपे योगे चिंतने वा अशापरी ।
संयमी यजिती यज्ञ व्रते प्रखर राखुनी ॥ २८ ॥
होमिती एकमेकात कोणी प्राण-अपान ते ।
रोधूनि गति दोहोंची प्राणायामास साधिती ॥ २९ ॥
प्राणात होमिती प्राण कोणी आहार तोडुनी ।
यज्ञ-वेत्ते चि हे सारे यज्ञाने दोष जाळिती ॥ ३० ॥
यज्ञ-शेषमृते धाले पावले ब्रम्ह शाश्वत ।
न यज्ञाविण हा लोक कोठूनि पर-लोक तो ॥ ३१ ॥
विशेष बोलिले वेदे असे यज्ञ अनेक हे ।
कर्माने घडिले जाण जाणूनि सुटशील तू ॥ ३२ ॥
द्रव्य-यज्ञादिकांहूनि ज्ञान-यज्ञ चि थोर तो ।
पावती सगळी कर्मे अंती ज्ञानात पूर्णता ॥ ३३ ॥
सेवा कर्राने ते जाण नम्-भावे पुसूनिया ।
ज्ञानोपदेश देतील ज्ञानी अनुभवी तुज ॥ ३४ ॥
ज्या ज्ञानाने असा मोह न पुन्हा पावशील तू ।
आत्म्यात आणि माझ्यात भूते निःशेष देखुनी ॥ ३५ ॥
जरी पाप्यांमधे पापी असशील शिरो-मणि ।
तरी ह्या ज्ञान-नोंकेने पाप ते तरशील तू ॥ ३६ ॥
संपूर्ण पेटला अग्नि काष्ठे जाळूनि टाकितो ।
तसा ज्ञानाग्नि तो सर्व कर्मे जाळूनि टाकितो ॥ 3७ ॥
ज्ञानासम नसे काही पवित्र दुसरे जगी ।
योग-युक्त यथा-काळी ते पावे अंतरी स्वये ॥ ३८ ॥
श्रद्वदेने मेळवी जान संयमी नित्य सावध ।
ज्ञानाने शीघ्र तो पावे शांति शेवटची मग ॥ ३९ ॥
नसे ज्ञान नसे श्रद्धा संशयी नासला पुरा |
न हा लोक न तो लोक न पावे सुख संशयी ॥ ४० ॥
योगाने झाडिली कर्मे ज्ञाने संशय तोडिले ।
जो सावधान आत्म्यात कर्मे त्यास न बांधिती ॥ ४१ ॥
म्हणूनि अंतरातील अज्ञान-कृत संशय |
तोडुनी ज्ञान-खडगाने ऊठ तू योग साधुनी ॥ ४२ ॥
... . अध्याय चवथा संपूर्ण ... .
Hits: 82