उपोद्धात - ५
लढाईत तोफांचा घोडेस्वारांपेक्षा पायदळाशी निकट संबंव असतो. कारण, शत्रूचा हल्ला आल्यास तोफांचा बचाव पायदळच करूं शकते, हल्ला करणारें पायदळ कवायती असेल तर बचाव करणारे पायदळही कवायतीच पाहिजे हे अगदी खरे; तथापि हैदरअलीच्या कवायती पायदळाची कवाईत बेताबाताची असल्यासुळे माधवराव पेशव्यांच्या अखेरीपर्यंत पायदळ पलटणी तयार करण्याची आवश्यकता पुणे दरबारांस भासली नाही,आणि केव्हाही झालें तरी अशी कायमची पुष्कळ पलटणें ठेवण्याची
पेशवेसरकारास सोयही नव्हती ! याचें कारण बहुतेक पेशवाई राज्य सरंजामांत वांटले गेले असून ते सरंजाम घोडेस्वारांचे होते. कांही मुलुख सरकारांत होता त्याच्या
उत्पन्नांतून खर्चदेय भागवून शिवाय इंग्रजांच्या लढाईकरितां पळटणांची तरतूद करणे अवश्य होतें. सरंजाम कमीजास्त करावे, स्वार कमी करून पायदळ वाढवावे, तर राजपत्री म्हणजे महाराजांनीं दिलेल्या सरंजामांत विनाकारण हात घालण्याचा अधिकार खुद्द पेशव्यांस नव्हता तो नानांस कोठून असणार? अशी स्थिती असल्यासुळे वसई, कल्याण वगैरे कोंकणांतल्या मुलखाचा इंग्रजांपासून बचाव करण्यासाठी नानाने दहापंधरा हजार हंगामी पायदळ चारदोन वर्षे बाळगले होतें ते अशिक्षितच होते. त्या पायदळांत सिंधी, रोहिले, अरब, पुरभय्ये वगैरे सगळे परदेशी लोक होते !
घोडेस्वार हे पायदळास पूर्वीपासून तुच्छ मानीत आले आहेत. इंग्रजांशी सालबाईच्या तहापर्यंत ज्या लढाया झाल्या त्यांत गनिमी काव्याने मराठ्यांचा बराच बचाव झाला. प्रत्येक प्रसंगी एका इंग्रजास दहावीस मराठे असे प्रमाण पडत गेल्यामुळे राघोबास पेशवाईवर स्थापण्याच्या कामी इंग्रजांचा काट चालला नाही. त्यावरून पायदळ पलटणें चाकरोस ठेवून त्यांची विद्या नवीन प्राप्त करून घेण्यापेक्षा आपकी जुनी गनिमी पद्धतच फार चांगली, असा नाना पाटील, बाबा फडके पटवर्धन इत्यादिकांचा ग्रह होऊन बसला; परंतु पुढे लौकरच टिपूशी लढण्याचा प्रसंग आला व त्याची कवायती फौजेची जय्यत तयारी मराठी मुत्सद्यांच्या व सरदारांच्या कानी येऊं लागली, तेव्हां त्यांचा तो ग्रह डळमळू लागला ! पुढें सन १७८६ मध्ये टिपूवर मोंगल व मराठी फौजा येऊन हरिपंततात्या चालून गेले. त्या खेपेस टिपूने तोफांच्या भडिमारानें मराठी व मोगल फौजा हैराण केल्या आणि छापे घालघालून त्यांची फार दुर्दशा केली ! त्या सुमारास हिंदुस्थानांत पाटीलबाबांनी डिबॉईंन या फ्रेंच सरदाराकडून सहजगत्या दोन पलटणें तयार करविली होती. आसपासच्या जमीनदारांस दहशत बसविण्यापुरतीच ती तरतूद होती. दक्षिणेतून टिपूच्या लढाईची वर्तमानें जो जो शिंद्याच्या कानी येऊं लागली तो तो आलेल्या अपयशाचें परिमार्जन करण्याकरितां टिपूवर स्वारी करण्याची पाळी आपणावर कधी तरी येणार असे त्याच्या मनांत येऊ लागले. त्या वेळी दिल्लीच्या बादशहार्चे राज्य त्याच्या वहिवाटीस असल्यामुळें असली कवाईत शिकलेली विदेशी फौज बादशहाचे नांव पुढें करून त्यास ठेवतां येण्याजोगी होती व त्याप्रमाणे त्यानें पुष्कळ पळटणे व त्यांना लागणारा तोफांचा सरंजाम दोनतीन वर्षात तयार करविला. सन १७५१ त महादजी शिंदा देशीं आला तेव्हां श्रीरंगपट्टणच्या स्वारीत सामील होण्याची त्याची तयारी झाली होती; परंतु तो पुण्यास येतो तो टिपूशी तह होऊन फौजा परत फिरविल्याची वर्तमाने आली; त्यासुळें तो बेत तितकाच राहिला. कवाइती पलटणींच्या जोरावर इंग्रजांवर पगडा बसविण्याची शिंद्यास इच्छा झालीच नसेल असें म्हणवत नाही पण तीं पलटणें ठेवतांना उद्देश निराळा होता एवढेंच येथें सांगावयाचें आहे.
शिंद्याच्या या नवीन कवायती फौजेंतले अंमलदार इंग्रज व फ्रेंच जातीचे असून त्यांनी ती फौज फारच चांगल्या तयारीला आणली होती. तथापि असली"फौज ठेवण्यापासून इंग्रजांशी लढतांना शिंद्यास फायदा व्हावयाचा तो झाला नाहो. दौलतराव शिंदा म्हणे की, मी इंग्रजांशी माझी पलटणे लढवीन; आणि रघोजी भोसला म्हणे की, माझ्याजवळ पलटणें नाहीत, मी गनिमी तर््हेनेंच लढणार ! शिद्याजवळ घोडेस्वार पुष्कळ होते, तेहि भोंसल्याप्रमाणेच बोलत होते; परंतु युद्धाचा बेत व त्याची तरतूद कोणीच केली नसल्यामुळें भोसल्याची गनिमी राहिली, शिंद्याच्या घोडदळाची बाजू विरघळली, आणि इंग्रजांचा सर्व मारा पलटणींवरच येऊन पडला ! आधीच कांही पलटणें व सरदार आयत्या वेळीं शिंद्यास सोडून इंग्रजांस मिळाल्यामुळे लढाईच्या मसलतीची घडी विस्कटली होती. त्यांतून कांही पलटणें राहिलीसाहिली तीही एखाद्या लढाईत एकत्र होण्याचा योग आला नाहो ! थोडथोड्या पलटणांचा आसई अलीगड लासवारी वगैरे ठिकाणी इंग्रजांशी लढाया झाल्या त्यांत त्या पलटणाींचा मोड झाला.