निवृत्तीतून वानप्रस्थात
किर्लोस्कर मासिकांच्या आणि छापखान्याच्या छपाईकामाच्या वाढीस वाडीचे क्षेत्र अपुरे पडत असल्यामुळे किर्लोस्कर प्रेसये पुण्यास स्थलांतर करण्याचा निर्णय चालकांनी घेतला होता. मुकुंदरावांना जुनी सर्व मंडळी उत्कृष्ट सहकार्य करीत होती; नवी येऊन मिळत होती. तीन दिवसांत वाडीतून यंत्रे पुण्यास आणून-काम सुरू करून मासिकाच्या अंकाची एक तारीख त्यांनी चुकू दिली नव्हती. आता प्रेसमध्ये नव्या स्वयंचलित यंभ्रांची भर पडली होती. निसर्गवेष्टित १३ एकर क्षेत्रावर दोन सुसज्ज इमारतीत प्रेसचा उद्योग मुकुंदराबांच्या नेतृत्वाखाली चालू असलेला पाहून शंकरभाऊना फार संतोष झाला.
किर्लोस्कर प्रेसच्या नव्या वास्तूत झालेला पहिला भव्य समारंभ म्हणजे 'सत्रीच्या/ ४०० व्या अंकाचे प्रकाशन. प्रथमपासूनच्या प्रसिद्ध लेखिका आनंदीबाई
शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास शंकरभाऊ पुण्यात उपस्थित होते. त्यामुळे समारंभास लेखक, लेखिका, वाचक, हितचिंतक प्रचंड संख्येने
उपस्थित होते. शंकरभाऊंना भेटण्याची सर्वांना उत्सुकता होती. म्हणून वेगळा अनौपचारिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम योजला होता. ३०-३५ वर्षांच्या संपादकीय कारकिर्दीत ज्या लेखक-लेखिका वगैरेशी निकटचा संबंध आला, महाराष्ट्रातील अशा २०० जणांनी स्वत:च्या अक्षरात शंकरभाऊंच्या आठवणी लिहून पाठविल्या. त्यांचा
सुबक स्मृतिग्रंथ करून ना. सी. फडके यांच्या हस्ते शंकरभाऊंना देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
शंकरभाऊ म्हणत, ''जीवनात भरपूर उद्योग करण्यात जसे समाधान आहे, त्याचप्रमाणे उद्योग आटोपल्यावर विश्रांती घेण्यातही विशेष समाधान आहे. हा विचार मनात ठेवून ५८च्या अखेरीस शंकरभाऊ किर्लोस्करवाडी सोडून घटप्रभा येथे आधी बांधून ठेवलेल्या छोट्या बंगल्यात पोचले. तेथील उत्कृष्ट हवा-पाण्याची प्रसिद्धी होती. ४० वर्षापूर्वी डॉ. कोकटनूर यांनी तेथे सॅनंटोरियम व हॉस्पिटल बांधले होते. खेड्यातील मंडळींना सवलतीने आरोग्यसेवा देण्याचे त्यांचे ध्येय होते.वैद्यकीय सेवेमुळे हे ठिकाण पंचक्रोशीत मोठे नाव मानले जात होते.
त्या जागेचे वर्णन शंकरभाऊंचे कविमित्र काव्यविहारी यांनी कवितेत हुबेहुब केले आहे.
गर्द तरूच्या छायेखाली सुबक झोपडी एक असावी ।
आणि बैसुनि तिथेच मजला वनशोभा चौफेर दिसावी ॥
मदिय निवासासमोर सुंदर स्वच्छ जलाशय एक असावा !
बसल्या जागेवरून तयाचा सहज मला विस्तार दिसावा ।।
झोपडीत माझीय सभोती निवडक सुंदर ग्रंथ असावे ।
सेवित असता सुधा तयातिल क्षुषातृष्णेचे भान नुरावे ।।
शंकरभाऊंच्या या वानप्रस्थाश्रमात त्यांना भेटायला सर्व भागातून मंडळी येत; पण ते स्वत: १९५८ मध्ये घटप्रभेस गेल्यापासून क्वचितच परगावी गेले.
१ जानेवारी १९७५ रोजी त्यांनी जगाचा निरोप घटप्रभेतच घेतला.
Hits: 123