२. स्वातंत्र्य संप्रामातील समर्पण - ४
२. स्वातंत्र्य संप्रामातील समर्पण - ४
यापूर्वी १९३३ साली सुटका झाल्यानंतर एस्. एम्.ने सेकंड एल.एल.बी.ची परीक्षा दिली. जामिनावर मुक्त असताना त्यांनी वकिलीची सनद काढली परंतु वकिली सुरू करण्यापूर्वीच चौपाटीवरील भाषणाबद्दल शिक्षा झाली आणि एस्.एम्.ना जानेवारी १९३५मध्ये साबरमती तुरुंगात पाठविण्यात आले. एस्. एम्.ना 'क' वर्ग देण्यात आला होता. ही दोन वर्षे फार कष्टाची गेली. दोन कडक उन्हाळे त्यांनी तेथे काढले. या उन्हाळ्यामुळे त्यांचे वजन १०३ पौंडावर आले. असे हाल होत असतानाही एस्. एम्. गुजराती शिकले. भाषा आत्मसात झाल्यावर अनेक गुजराती कादंबऱ्या त्यांनी वाचल्या. मार्क्सचे 'कॅपिटल' मिळविले होते. तेही वाचले. एस्. एम्. यूथ लीगचे काम करीत असताना १९३२ साली तारा पेंडसे ही विद्यार्थीनी त्यांना भेटायला आली. तिने एस्. एम्.कडे समाजवादावरील पुस्तके मागितली. त्यातून दोघांची ओळख झाली आणि मैत्री जमली. एस्. एम्. साबरमतीच्या तुरूंगात होते त्यावेळी तारा पेंडसे पुण्याला कर्वे विद्यापीठात शिकत होती. तिची नियमाने एस्. एम्.ना पत्रे येत. दोघांची मने जुळली होती. साबरमती जेलमध्ये असह्य उन्हाळा होता. जेवायला मिळणारे अन्न निकृष्ट आणि बेचव होते. प्रकृती बिघडत होती. परंतु तारा पेंडसेच्या पत्रातून व्यक्त होणाऱ्या प्रेमामुळे हेही सुसह्य होत होते.
१ ऑगस्ट १९३६ला एस्. एम्-ची साबरमती तुरुंगातून सुटका झाली. सुटकेच्या वेळी एस्. एम्.चे मित्र आणि कॉग्रेस सोशॅलिस्ट पार्टीतील सहकारी प्र. दातवाला एस्. एम्-ना घरी घेऊन गेले. त्या दिवशी लो. टिळकांची पुण्यतिथी होती. एका हॉलमध्ये सभा होती. एस्. एम्.ना बोलण्यास सांगण्यात आले. त्यांनी हिंदीतूनच भाषण केले.
भाषणाच्या शेवटी एस्. एम्. म्हणाले, 'लोकमान्य टिळक म्हणाले होते, 'स्वराज्य हा माझा जन्मसिष्द हक्क आहे. तो मी मिळवीनच.' हा त्यांचा निर्धार आपण सर्वांनी लक्षात ठेवला पाहिजे.' एस्. एम्. गुजरात मेलने मुंबईस आले. तेथे मित्रांनी त्यांचे हार्दिक स्वागत केले. पुण्याला आल्यावर एस्. एम्. यांनी शनिवार पेठेत दहा रुपये भाड्याने खोली कशीबशी मिळवली.
एस्. एम्. तुरुंगात असताना पक्षाच्या ध्येय धोरणात बदल करण्यात आला. जयप्रकाश नारायण यांना त्यांच्या पक्षांची एकजूट करणे आवश्यक वाटत होते. त्या त्यांच्या आग्रहामुळे मीरत येथे झालेल्या पक्षाच्या परिषदेत सोशलिस्ट पक्ष हा मार्क्सिस्ट सोशलिस्ट पक्ष आहे, असे ठरविण्यात आले. जयप्रकाश नारायण यांनी याचवेळी '४0॥/ 9008 2. हे पुस्तक लिहिले व प्रसिद्ध केले. त्या पुस्तकात त्यांनी मार्क्सवादी भूमिका मांडली होती. ना. ग. गोरे यांनी या पुस्तकाचे मराठीत 'समाजवादच का?' असे भाषांतर केले. त्या वेळी सोशलिस्ट कार्यकतें या पुस्तकाला आपला वैचारिक प्रबंध मानीत.
फैजपूर काँग्रेस
१९३६ सालो महाराष्ट्रात फैजपूर येथे काँग्रेसवे अधिवेशन भरणार होते. ग्रामीण भागात भरणारे काँग्रेसचे ते पहिलेच अधिवेशन होते. पं. जवाहरलाल नेहरू हे नियोजित अध्यक्ष होते. अधिवेशनाची व्यवस्था करण्यासाठी काँग्रेस सेवा दलाची संघटना उभी करण्यात आली. रावसाहेब पटवर्धन हे या सेवादलाचे प्रमुख होते. रावसाहेबांच्या आग्रहामुळे एस्. एम्. हे फैजपूर काँम्रेसच्या प्रचार समितीचे चिटणीस झाले. खानदेशातील निष्ठावंत काँग्रेस कार्यकतें धनाजी नाना चौघरी, लोडुभाऊ फेगडे यांच्याबरोबर एस्. एम्. खानदेशात पायीही अनेक गावांतून गेले. दीड महिन्याच्या या पदयात्रेत एस्. एम्.ना खानदेशातील ग्रामीण जीवनाचे वास्तव दर्शन झाले. गावागावात शेतकरी समाजातले लेवापाटीदार आणि मराठा गुण्यागोविंदाने राहात. खानदेशाच्या या दौऱ्यानंतर एस्. एम्.च्या लक्षात आले की भारताची स्वातंत्र्य चळवळ प्रभावी व्हायची असेल तर शेतकर्यांना चळवळीत आणले पाहिजे. एस् एम्.ना मुंबईचा कामगार वर्ग परिचित होता. त्यांना यावेळी वाटले की कामगार क्रांतिकारक असला तरी भारतात क्रांती घडवून आणायची असेल तर ग्रामीण भागातील जनतेचा, शेतकरी वर्गाचा त्या क्रांतीला पाठिंबा असला पाहिजे. एस्. एम्.नी त्यांच्या आत्मकथेत 'माझ्या विचारांना जो एकांगीपणा आला असता तो फैजपूरमुळे टळला, नाहीतर आम्ही केवळ कामगार संघटित करण्यावरच भर देत असतो.' फैजपूर काँग्रेसच्या अधिवेशनापूर्वी प्रचारासाठी हिंडताना एस्. एम्.यांचा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील अनेक कार्यकर्त्यांशी संबंध आला आणि त्या कार्यकर्त्यांनाही एस. एम्.चा मनमोकळा स्वभाव, साधे राहणे आणि भाषणांतून प्रगट होणारे त्यांचे देशप्रेम, यामुळे ते हवेहवेसे वाटू लागले.
२० नोव्हेबर १९३६ला रॉय यांची सुटका झाली. ते फैजपूर काँग्रेसला हजर राहिले. घटना परिषदेसंबंधीच्या ठरावावर त्यांचे भाषण फार माहितीपूर्ण आणि मुद्देसूद झाले. पं. जवाहरलाल नेहरूंचे अध्यक्षीय भाषण फारच स्फूर्तिदावी झाले, त्यांनी भाषणात आपण समाजवादी आहेत हे स्पष्टपणे आणि आप्रहपूर्वक सांगितले.
Hits: 85