माथेरान
मुंबईनजिक असलेले हे थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे. सह्याद्रीच्या कुशीत ८०० मीटर उंचीवर ते असल्याने येथील वातावरण व परिसर निसर्गरम्य आहेच आणि हवाही निर्मळ आहे. माथेरानचा शोध १८५० मध्ये ब्रिटीश पर्यटकांनी लावला. त्यानंतर या ठिकाणी ब्रिटीशांनी व पारशी धनवंतांनी बंगले बांधून गाव वसवलं. अश्वारोहण, गिरिकंदरातील मनमुराद भटकंती, गिर्यारोहण तसेच खरेदी अशा हेतूने पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात. दृष्टीसुख देणारे ३३ पाइंर्टस् माथेरानच्या परिसरात आहेत. हार्ट पॉइंर्ट, पे मास्टर पार्क, पॅनोरमा, एकोहार्ट, वन ट्नी हिल, मंकी हिल असे काही पॉइंर्टस् प्रसिद्ध आहेत. |