औदुंबर
सांगली शहरापासून सुमारे २५ कि. मी. अंतरावर कृष्णा नदीच्या काठावर श्री गुरू दत्तात्रयांचे हे स्थान आहे. नरसोबाची वाडी किंवा गाणगापूर या स्थानांप्रमाणेच औदुंबरला दत्तभक्तांच्या दृष्टीने मोठे स्थानमहात्म्य लाभले आहे. औदुंबर गावाच्या परिसरात औदुंबराची असंख्य झाडे असल्यानेच बहुधा या स्थानास औदुंबर हे नाव पडले असावे. औदुंबर हे गाव तसे लहान आहे पण त्याचा महिमा मोठा आहे. येथील ब्रम्हानंद स्वामींचा मठ तसेच भुवनेश्वरी देवीचे मंदिर पाहण्यासारखे आहेत. |