मोरेश्वर
मोरेश्वर
|
पुणे जिल्ह्यातील मोरगाव या गावी असलेले हे गणेशस्थान मोरेश्वर अथवा `मयुरेश्वर' या नावाने ओळखले जाते. या देवस्थानी असलेली श्रीगणपतीची मूर्तीसुद्धा स्वयंभूच आहे. मूर्तीचे सोंड डावीकडे असून डोईवर नागफणा आहे. मंदिर उत्तराभिमुख असून बांधणी चांगली आहे. आवारात दीपमाळ आहे. या मंदिराच्या परिसरातूनच कऱ्हा नदी वाहते. मंदिराच्या समोरच्या चौथऱ्यावर भव्य नंदी असून जवळच पाषाणाचा उंदीर आहे. गाणपत्य संप्रदायाचे हे स्थान म्हणजे आद्यपीठ असून अष्टविनायकात या स्थानाला अग्रस्थान आहे. मोरया गोसावी यांनी या ठिकाणीही तपश्चर्या केली होती व या स्थानाच्या परिसरातील कऱ्हा नदीत त्यांना गणेशमूर्ती प्राप्त झाली होती. पुढे हीच मूर्ती चिंचवडला आणून त्यांनी प्रतिष्ठापना केली. |