बल्लाळेश्वर
|
रायगड जिल्ह्यातील खोपोली या शहरापासून हे स्थान जवळ आहे. येथील गणपती `बल्लाळेश्वर' या नावाने प्रसिध्द आहे. मंदिराची बांधणी रेखीव असून ते पूर्वाभिमुख आहे. या देवस्थानाच्या मागेच एक स्वयंभू गणपतीचं मंदिर आहे. व तेथील गणपती धुंडीविनायक म्हणून ओळखला जातो. कल्याण श्रेष्ठींचा मुलगा बल्लाळ याच्या उपासनेतूनच प्रगट झालेला हा गणपती म्हणून त्यास बल्लाळेश्वर असे नाव पडले. |