शतायुषी दान

Parent Category: चित्रफिती Category: कविता ध्वनीचित्रफीत Written by सौ. शुभांगी रानडे

शतायुषी दान

देई गुरुमाऊलीला माझ्या, शतायुषी दान, देवा
गुरुमाऊलीला माझ्या, शतायुषी दान ऽ ऽ ऽ . . . ॥ध्रु.॥

गुरूगृही जाण्यासाठी, पुरे प्रेमाचे बंधन
गुरूचरणी लाभते, सुखशांतीसमाधान
सुखशांतीसमाधान ऽ ऽ ऽ
देई गुरुमाऊलीला माझ्या, शतायुषी दान, देवा
गुरुमाऊलीला माझ्या, शतायुषी दान ऽ ऽ ऽ . . . १

गुरूसेवेमध्ये होई, माझी काया ही चंदन
गुरूचरणाशी माझे, नित्यनेमानं वंदन
नित्यनेमानं वंदन ऽ ऽ ऽ
देई गुरुमाऊलीला माझ्या, शतायुषी दान, देवा
गुरुमाऊलीला माझ्या, शतायुषी दान ऽ ऽ ऽ . . . २

गुरूकृपा हेच माझं, सर्व संसाराचं धन
तुझ्याकडे देवा माझं, नाही दुजं रे मागणं
नाही दुजं रे मागणं ऽ ऽ ऽ
देई गुरुमाऊलीला माझ्या, शतायुषी दान, देवा
गुरुमाऊलीला माझ्या, शतायुषी दान ऽ ऽ ऽ . . . ३

— — सौ. शुभांगी सु. रानडे

Hits: 338
X

Right Click

No right click