१४. ग्वाल्हेर १९२८ - माधव श्रीहरि अणे

 

उच्चारानुसारी भाषा लिहिण्याच्या मोहात पडल्यास महाराष्ट्रीयांच्या ग्रांथिक भाषेतील पद्धतीत प्रत्येक जिल्हानिहाय व ज्ञातिनिहाय भेद दृष्टीस पडू लागतील. व मराठी बोलणार्‍या जनतेस एकभावनेच्या सूत्राने एकत्रित करणार्‍या सरस्वती देवीच्या मंदिरातही पंक्तिप्रपंचास प्रारंभ होईल. आणि त्यामुळे वाङ्मयाचा उद्देश निष्फळ होईल.

Hits: 16