काकू बाई

Parent Category: मराठी पुस्तके Category: काव्यदीप पुस्तक - ७.इतर Written by सौ. शुभांगी रानडे

काकू बाई

शेजारच्या काकू
घाईघाईने उठल्या
सकाळच्या प्रहरी
व्यायाम करु म्हणाल्या ---- १

`होय-नाही'' म्हणता म्हणता
कपभर चहा प्यायल्या
``राहू दे बाकीचा
आल्यावर घेऊ'''' म्हणाल्या ---- २

जामानिमा आवरून
चपला सरकवल्या
सहाचे ठोके ऐकताच
``येते हो'''' म्हणाल्या ---- ३

झपाझप पावले टाकीत
काकूबाई निघाल्या
पण पाच-दहा पावलातच
गळाठून गेल्या ---- ४

``आज पुरे. उद्या बघू ''''
काकू पुटपुटल्या
अन् कशाबशा धापा टाकीत
घरापर्यंत आल्या ---- ५

Hits: 180
X

Right Click

No right click