सन्मती
अरे अरे माणसा -
आयुष्यभर जपत आलास
स्वत:च्याच मताला
एकदा तरी द्यावी म्हणते
किंमत दुसर्या}च्या मनाला ---- १
आयुष्यभर वाजवत आलास
स्वत:चीच टिमकी
एकदा तरी म्हणते मी
दुसर्या-चं ऐकावं की ---- २
आयुष्याच्या अंतिम टप्प्यावर
येऊन पोहोचल्यावरती
एकदा तरी बोल महणते
मान घालून खालती ---- ३
आता सारी भिस्त आहे
त्या विठूरायावरती
तोच देवो सर्वांना
थोडी तरी सन्मती ---- ४
Hits: 171