शिक्षण

Parent Category: मराठी पुस्तके Category: काव्यदीप पुस्तक - ७.इतर Written by सौ. शुभांगी रानडे

माणसा रे माणसा,
शिकायचे असेल तर
एवढेच शीक-
सुंदर सुरेल पक्षांच्या
गळयामधली तान शीक ---- १

माणसा रे माणसा,
शिकायचे असेल तर
एवढेच शीक-
गुणगुणणार्याम भुंग्याकडून
गुणांचे गुणगान शीक ---- २

माणसा रे माणसा,
शिकायचे असेल तर
एवढेच शीक-
मिणमिणणा-या पणतीकडून
सर्वस्वाचे दान शीक ---- ३

माणसा रे माणसा,
शिकायचे असेल तर
एवढेच शीक-
झुळझुळणा-या झ-याकडून
जीवनाची जाण शीक ---- ४

माणसा रे माणसा,
शिकायचे असेल तर
एवढेच शीक-
साधुसंतजनांकडून
परमेशाचे ध्यान शीक ---- ५

Hits: 167
X

Right Click

No right click