कुणा वाटे

Parent Category: मराठी पुस्तके Category: सांगावा कवितासंग्रह Written by सौ. शुभांगी रानडे

कुणा वाटे

व्यक्ति तितक्या प्रकृती. प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळया गोष्टीत आनंद मिळतो. कुणाकुणाला कशात आनंद मिळतो ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

कुणा वाटे आनंद निसर्गात
कुणा येई मजा भोजनात
कुणी घेती रस राजकारणात
सुखही वाटे ते दुजा शिकवण्यात . . .१

गर्क होती ते कुणी सिनेमात
गुंग होती कुणी तसे नाटकात
कुणी होई ते धुंद गायनात
जाई रंगुनी तो कुणी कुंचल्यात . . . २

बुडुनी जाती ते कुणी वाचनात
हौस वाटे ती कुणा खेळण्यात
छंद लागे तो कुणा काव्यलेखनात
दंग होती ते कुणी चिंतनात . . . ३

कुणा दिसते सुख कलाकुशलतेत
धन्य म्हणती कुणी धनधान्यसंचयात
सौख्य वाटे परि कुणा चाकरीत
सुखी राही कुणी गोरगरीबीत . . . ४

सुखही वाटे ते कुणा निंदण्यात
नसे मजला परि रागही मनात
सत्यवाणी ज्या वसे ती मुखात
जगी दुर्मिळ नर असा पाहण्यात . . ५

Hits: 177
X

Right Click

No right click