८८ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन २०१५, घुमान (पंजाब)
८८ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन २०१५, घुमान (पंजाब) येथे ३ ते ५ एप्रिल इ.स. २०१५ दरम्यान झाले. या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे होते.या घुमानच्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाश पायगुडे यांनी घुमान, पंजाब, शीख धर्म आणि या साऱ्या पार्श्वभूमीचा आढावा ’साहित्य वारी’ नावाच्या पुस्तकात घेतला आहे. पुस्तकात प्रारंभी नामदेवांच्या कार्याची ओळख करून दिली आहे. त्यानंतर घुमान आणि नामदेव यांचा परस्पर संबंध उलगडून दाखवला आहे. बाबा नामदेव असे संबोधले जाणारे संत नामदेव कसे होते याची माहिती दिली आहे. शीख धर्म, त्यांचे दहा गुरू आणि पंजाब यांची माहिती या पुस्तकातील एका स्वतंत्र प्रकरणामधून मिळते.
आजवरची साहित्य संमेलने, संमेलनांचे अध्यक्ष यांच्या माहितीचा समावेशही पुस्तकात करण्यात आला आहे. पुस्तकाला घुमान संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांची प्रस्तावना लाभली आहे. पुस्तक प्रकाशक - संगत प्रकाशन (नांदेड)
Hits: 74