असली-नकली
घर होतं भलं मोठ्ठं
पण स्वच्छतेचं नाव नव्हतं
सगळीकडे धूळच धूळ
पाहणार्या\ला लागायचं खूळ . . . १
क्षणभर वाटलं बाह्या सरासावून
आपणच करावं झाडपूस सारवण
पण दुसर्यायचं घर, करता काय?
अलगद वर घेतले पाय . . . २
आरसा समोर दिसला म्हणून
सहज पाहिले वाकून
डोकावणारे धुळीच्या पलिकडून
दिसले स्वच्छ निर्मळ मन . . . ३
लख्ख ऊन पडले अन् दूर गेली सावली
शंकेची पाल भिऊन पळाली
बाहेरची स्वच्छता केवळ नकली
मनाची स्वच्छता हीच खरी असली . . . ४
Hits: 137