देव
देव
देव असे तो जगतामधि या भरूनिया की राही
अर्पिल्याविण कायावाचामने न दृष्टिस येई
कधी कुणाच्या रूपे आपणा मदत कराया येई
म्हणुनि मानवा नामामृत हे सदासर्वदा घेई . . . १
भल्या पहाटे मंजुळसे स्वर कानी आपुल्या येती
स्वागत करिती सुप्रभाती पक्षीगण या रीती
अंधारी ती रातचि सरता चांदण्या विरघळती
नीलनभी या सोनपाऊली सूर्यदेव अवतरती . . . २
वृक्षलता अन् झाडेझुडपे गोष्टिस एका कथिती
जे जे आपणाजवळी ते ते द्यावे दुसर्या.साठी
गरीबबापुड्या वृद्धजनांची सदाच व्हावे काठी
इतरजनांचा विचार करिता देवचि राही पाठी . . . ३
ज्ञाना, गोरा, तुकया, नामा कुणी वेगळे नसती
परि सुमती त्यांची दावी त्यांना सुजनांची ही रीती
नरनारी अन् पशुपक्षीही सारे एकचि असती
देवरूप ते होऊनि सारे जगती या वावरती . . . ४
निर्गुण आणि निराकार तो व्यापी चराचर सृष्टी
कृष्णचि जेवि नंदाघरचा गोपगोपी आकृष्टी
अथकप्रयत्ने संतचि करिती आनंदाची वृष्टी
समाधान अन् शांतीस देई नितळशी ती दृष्टी . . . ५
Hits: 128