चाफेकर नि रानडे यांजवरील फटका - १२

Parent Category: मराठी पुस्तके Category: स्वातंत्र्यवीर सावरकर समग्र कविता Written by सौ. शुभांगी रानडे

चाफेकर नि रानडे यांजवरील फटका - १२

असोत अरिचे ठायी जरि गुण अनुकरणीयचि जरि ठरती ।
अभिमानास्पद तरि न गमावी स्वजनकीर्तिमजकांहोती? ॥१

भ्याले नाही काळालाही झटावया जनकार्याते ।
वचकावें मी काय म्हणोनी स्तवण्यासी त्या आर्यांते? ॥ २

विरुद्धपक्षी स्वये वानिती जया धाडसी नररत्नां ।
कृतज्ञ व्हाया, सद्गुण गायाम्या न करावें कां यत्नां? ॥३

शतकामागे हेंच चमकतें तेज आज जे खुनी दिसे ।
दिसे अंधळ्या, दुबळ्या धूर्ता जें, तें बहुधा तसें नसे ॥४

वितंडवादी पंडित बनतो, साधुश्रेष्ठही तो सोदा ।
नाना सद्गुण दुर्गुण ठरती, वक्रकाल हा हरि मोदा ॥ ५

अन्यायप्रवणांना दंडूं, रणीं पुढेची पद ज्यांचे ।
ठरति कसे अपराधी ते जे करिति दमन परस्त्तेचें ॥ ६

फाशी ना ती यज्ञवेदिका रक्ते न्हाली जी तुमच्या! ! ।
सांडुनी होवो त्याचि राष्ट्रणिं सार्थक रक्ताचें अमुच्या ॥ ७

कार्य सोडुनी अपुरें पडला झुंजत, खंती नको! पुढे ।
कार्या चालवु गिरवुनि तुमच्या पराक्रमाचे अम्ही धडे ॥ ८

-------------

Hits: 168
X

Right Click

No right click