स्वागतकक्ष
मायमराठी - मराठी माऊली
माझी मराठी माऊली
सा-या जगाची सावली
घरी गं माझ्या आली
माझी मराठी माऊली ---- १
शालू सखूचा ल्यायिली
पैठणी बहिणाई आणिली
साऱ्या जगी देखणी
माझी मराठी माऊली ---- २
चोळी जनीच्या हाताची
जरी मुक्तीच्या काठाची
अंगी मऊ मखमली
माझी मराठी माऊली ---- ३
हार नाम्याने घातला
गजरा सावत्याने माळिला
पैंजण नाथा घाली
माझी मराठी माऊली ---- ४
चुडा तुक्याने भरविला
मुकुट ज्ञान्याने चढविला
सकला हाती धरी
माझी मराठी माऊली ---- ५
गजर करिती वारकरी
जमती विठूच्या नगरी
पंढरी खरी दुमदुमली
माझी मराठी माऊली ---- ६
माझी मराठी माऊली
गंगा ज्ञानाची जाहली
दिगंतरासि निघाली
माझी मराठी माऊली ---- ७
---कै सौ. शुभांगी रानडे
जर आपला वेबसाईटदर्शक (ब्राऊजर) ध्वनीफीत कार्यान्वित करीत नसेल तर
कृपया मोबाईतवर QR Reader ॲप डाऊनलोड करून कविता ऐकावी
अन्यथा खालील लिंक वापरून ध्वनीफीत लिंक मिळवावी.
काही अडचण आल्यास info@dnyandeep.net येथे संपर्क साधावा.
