Designed & developed byDnyandeep Infotech

७५. पुणे २००२ राजेंद्र बनहट्टी

Parent Category: साहित्य संमेलने

संगणकाचे ठिकठिकाणी मराठीकरण होत आहे. अनेक शाळांमध्ये, संस्थांमध्ये जे संगणकीकरण झालेले आहे ते मराठीमध्ये झालेले आहे आणि संगणकीय तंत्रज्ञानाचे हे मराठीकरण यापुढे सगळीकडे झपाट्याने होत राहणार आहे. कारण ती मराठी माणसाची गरज आहे. त्यामुळे आजही संगणकाची परिभाषा मराठीत तयार होत आहे. कॉम्प्युटरला संगणक हा शब्द आलाच ना ? इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीला माहिती तंत्रज्ञान हा शब्द आला. कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंगला संगणक प्रणाली कॉम्प्युटर व्हायरसला संगणक विषाणू असे शब्द प्रचलित होत आहेत आता इंटररनेटदेखील मराठीत आलेले आहे आणि इमेलवरसुध्दा देवनागरीचा वापर सुरु झाला आहे. रयत शिक्षण संस्थेच्या दोनशे माध्यमिक शाळांमध्ये तर संगणकाचे शिक्षण गेल्या तीन वर्षापासून मराठीतून दिले जात आहे. तेव्हा संगणक युगात अगदी पहिलीपासून इंग्रजी शिकणे अपरिहार्य आहे, हे म्हणजे तितकेसे खरे नाही. आज विज्ञानात, संगणकीय आणि माहिती तंत्रज्ञान जे शेकडो, हजारो भारतीय तज्ञ आहेत ते पहिलीपासून इंग्रजी शिकले आहेत काय ? उलट मराठी माध्यमात शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थीच विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या पदांवर पोचलेले आहेत. इतकेच नव्हे तर परदेशात जाऊनही त्यांनी नेत्रदीपक यश मिळवलेले आहे, ही वस्तुस्थिती आहे. जयंत नारळीकर, सुखात्मे, माशेलकर, गोवारीकर ही नावे आपल्या डोळयासमोर आहेतच. जयंत नारळीकर तर म्हणालेच आहेत, मातृभाषेतून विज्ञान शिकवणे सोपे जाईल. विज्ञान हा विचार करायला लावणारा विषय आहे. विद्यार्थी ज्या भाषेत विचार करतो ती भाषा विज्ञान शिक्षणाला उपयुक्त ठरते. पण सगळया प्रकारच्या मुळाशी इंग्रजी आल्याविशाय मुलाची जीवनात, विशेषत: विज्ञान, तंत्रज्ञान यात प्रगती होणार नाही. पण ही समजून चुकीची आहे. जगामध्ये चीन, रशिया, जपान, कोरिया, फ्रान्स, जर्मनी, इटली, पोलंड, स्पेन, हॉलंड, बेल्जियम, पोर्तुगाल असे कितीतरी देश आहेत की ज्या ठिकाणी मातृभाषेतून सर्व शिक्षण दिले जाते.

X

Right Click

No right click