Designed & developed byDnyandeep Infotech

६७. पणजी १९९४ - राम शेवाळकर

Parent Category: साहित्य संमेलने

 लेखक आपले शब्द कागदावर उमटवतो, वक्ता ते श्रोतृहृदयावर उमटवतो. कागदावरचे शब्दसुद्धा कालांतराने विसरले जाऊ शकतात. काही काळ त्यांनी केलेला संस्कार बाकी कायम राहतो. पुढे पुढे लेखकाचे व पुस्तकाचे नावही लक्षात राहत नाही. पण त्या लेखकाने आपल्या लेखनाद्वारे केलेले संस्कार माणसाला सोडून जात नाहीत. लेखनामुळे त्याच्या वृत्तीत, जाणिवेत व एकूणच मानसिकतेत जो सूक्ष्म बदल झालेला असतो, तो तात्काळ लक्षात येत नाही. विद्वत्ता व बहुश्रुतता प्रदर्शित करण्यासाठी पुष्कळदा लेखनातील काही अंश उपयुक्त ठरतात ही गोष्ट खरी आहे. पण त्या उद्धरणांचा माणसाच्या मानसिकतेशी संबंध अल्प असतो व प्रदर्शनप्रियतेशी अधिक असतो. व्याख्यानाच्या बाबतीत तेवढे करता न आले, तरी अंतरिक संस्कारशीलतेच्या दृष्टीने लेखन आणि वक्तृत्व यांच्यातील साम्य लक्षात यायला हरकत नाही.

X

Right Click

No right click