Designed & developed byDnyandeep Infotech

१२ मुंबई १९२६ - माधवराव विनायक किबे

Parent Category: साहित्य संमेलने

 

तात्कालिक स्वरूपाचे, प्रचंड खळबळ उडविणारे अथवा स्तिमित करणारे सारस्वत कितीही प्रसिद्ध होत असले तरी वाङ्मयाच्या अभिवृद्धीच्या प्रगतीच्या दृष्टीने ते विचारात घेण्याचे कारण नाही, हे स्पष्ट आहे. साहित्याच्या दृष्टीने ज्याची योग्यता कालनिरपेक्ष आहे अशा वाङ्मयाची भर भाषेत किती पडत आहे, ते पाहून त्यावरून भाषेची प्रगती मोजणे योग्य होईल. वाङ्मयाचा उद्देश हा केवळ भाषेतील पुस्तके वाढविणे हा नसतो, तर लोकादरास चिरकाल पात्र असणार्‍या साहित्याची निर्मिती किती होत आहे हे पाहणे आवश्यक आहे.

X

Right Click

No right click