बालकविता-६

Written by Suresh Ranade
 
    
 
  आकाशांत फुलें, धरेवर फुलें, वार्‍यावरीही फुले,
माझ्या गेहिं फुलें. मनांतहि फुलें, भूगभिं सारीं फुलें !! ......नारायण वामन टिळक.
आली दिपवाळी, गड्यांनों, आली दिपवाळी
रोज रोज शाळा, पुरे ती आला कंटाळा
चार दिवस आतां, मनाला कसली ना चिंता......माधवानुज.
घे कुठार ! कर उगार, घाव अतां घालीं
धरणीनें पोशियले .....वा.गो.मायदेव
गुलाब, जाई, जुई, मोगरा, चाफा, शेवंती
बागेमाजी एकसरानें फुलूनियां डोलती।।१। .... दा. वि. फफे
केली रवीनें निजताप दुर,
वाहे हराया श्रम हा समीर; ...... मोरो गणेश लोंढे
हे डाळिंबाचे दाणे वेड्या! घात तुझा करिता
कवटी तूं कवठावरली ..... काव्यविहारी
मरणांत खरोखर जग जगतें;
अधिं मरण, अमरपण ये मग तें......भा. रा. तांबे.
हे कोण बोलले बोला? राजहंस माझा निजला!
दुर्दैवनगाच्या शिखरी। नवविधवा दु:खी आई
ते हृदय कसे आईचे । मी उगाच सांगत नाही!............गोविंदाग्रज
विटीदांडूचा खेळ मजेदार
धूम चालुनिया लोटली बहार
गुंग झालेला बाळ खेळण्यात..........वा .गो. मायदेव
वासुदेव आला दारी, वासुदेव आला,
चिमणा वासुदेव आला.
टोपीवर मोरपिसांला
खोवुनिया येथे आला...........के. नारखेडे
फळे मधुर खावया असति, नित्य मेवे तसे
हिरेजडित सुंदरी कनकपंजरीही वसे,.....कृष्णशास्त्री चिपळूणकर
पतंग उडवू चला
गड्यांनों, पतंग उडवूं चला . .....अ. ज्ञा. पुराणिक.
पांखरा! येशिल का परतून? .
मत्प्रेमाने दिल्या खुणांतुन
एक तरी अठवून?पांखरा! .....नारायण वामन टिळक
Hits: 20