बालकविता-३

Parent Category: मराठी साहित्य
बहु असोत सुंदर संपन्न की महा
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ...... श्री. कृ. कोल्हटकर.
मोत्या शीक रे अ आ ई !
सांगुं कितीतरि बाई ! .... दत्त.
या बाळांनो, या रे या लवकर भरभर सारे या । ..... भा. रा. तांबे.
ये ये ताई पहा पहा
गंमत नामी किती अहा ! ......हरी सखाराम गोखले.
लइ मानस अमुचा, द्यावी आपल्या घरीं ही पोर
पर शंका येउन कांहीं घेते हें मन माघार ! ......यशवंत.
लहान माझी बाहुली
मोठी तिची सांवली ......
लहान सुंदर गोजिरवाणी दिसे कशी ही खार
गुलगुलीत हे अंग मजेचें शेपुट गोंडेदार. ......म. का. कारखानीस.
वन सर्व सुगंधित झालें,
मन माझें मोहुन गेलें - किति तरी !......नारायण वामन टिळक
वाढुं दे कारागृहाच्या भिंतीची उंची किती
मन्मना नाहीं क्षिती......यशवंत.
वाहवा ! वाहवा ! चेंडू हा ।
तर तो आपण घेउनियां ।......मिस मेरी भोर.
वेडिंवाकडी घेउन वळणें
नागिण धांवे जणुं रोषानें......वा. गो. मायदेव.
शिवी कोणा देऊ नये ।।
कोणासंगे भांडू नये ।।......
श्रावणमासीं हर्ष मानसीं हिरवळ दाटे चोहिंकडे;
क्षणांत येतें सरसर शिरवें, क्षणांत फिरुनी ऊन पडे. ......बालकवि ठोंबरे.
X

Right Click

No right click