Designed & developed byDnyandeep Infotech

इडली

Parent Category: मराठी संस्कृती
साहित्य :-
दोन वाट्या तांदूळ अगर तांदळाचा रवा, एक वाटी उडीद डाळ

कृती :

डाळ, तांदूळ वेगवेगळे ४ ते ५ तास भिजत ठेवून नंतर त्यातील पाणी काढून वेगवेगळे वाटणे. वाटताना थोडं थोडं पाणी घालावे. तांदूळ व डाळ बारीक वाटावे. मिक्सरच्या वरच्या झाकणाचे मध्ये छोटं झाकण असेल तर ते काढावे म्हणजे डाळ हलकी होते व इडल्या चांगल्या फुगतात. वाटल्यावर दोन्ंही पीठ एकत्र करून रात्रभर झाकून ठेवणे. सकाळी इडली पात्रात अगर वाट्यांना आतून तेलाचा हात लावून अर्धी वाटी एवढं पीठ भरून इडल्या १५ मिनिटे उकडाव्यात. चटणीबरोबर द्यावी.
खिमा इडली- इडली उकडताना अर्ध पीठ घातलं की मध्ये थोडा शिजलेला खीमा घालून परत वरती थोडं पीठ घालून सारखं करावं व इडली उकडावी. ही झाली खिमा इडली. उकडल्यावर ती भरपूर तेलात तळून टोमॅटो केचपबरोबर छान लागते. खिम्याऐवजी वाटाणा ऊसळ अगर आपल्या आवडीचं कोणतही सारण भरू शकता. डोश्याची चटणी अगर आपली नेहमीचीची चटणी इडली बरोबर द्यावी.

X

Right Click

No right click