Designed & developed byDnyandeep Infotech

लिंबूचे लोणचे

Parent Category: मराठी संस्कृती
साहित्य :-
एक डझन मोठी लिंबे, अर्धी वाटी लाल तिखट, एक ते दीड वाटी मीठ, एक चमचा मेथी, एक चमचा हिंगाची पूड, दोन चमचे हळद

कृती :
 लिंबे स्वच्छ धुऊन, पुसून भरल्या वांग्यासारखी चिरावी. (चार चिरा पाडाव्यात.) दोन चमचे तेलात मेथी व हिंगाची पूड तळून घेऊन नंतर त्याच तेलात हळद परतून घ्यावी. मेथीची पूड करून घेऊन ती व तिखट, मीठ, हळद, व हिंगाची पूड असे सर्व जिन्नस एकत्र करून तो मसाला लिंबात भरावा. अशी भरलेली लिंबे बरणीत घट्ट दडपून भरून ठेवावी. व त्यावर थोडे मीठ पसरून ठेवावे. लिंबे चांगली मुरल्यावर खावयास घ्यावी. मुरेतोपर्यंत लिंबे मधूनमधून हलवावी. खार जास्त हवा असल्यास त्या प्रमाणात लिंबाचा रस लोणच्यात घालावा.
X

Right Click

No right click