Designed & developed byDnyandeep Infotech

रसमलई

Parent Category: मराठी संस्कृती
साहित्य :-
एक लिटर दूध, अर्धी वाटी साखर, एक चमचा कॉर्नफ्लोअर, बदाम, बेदाणा, पिस्ते, तयार करून घेतलेले रसगुल्ले, साय.

कृती :

दूध आटवून पाऊण लिटर करावे. दाटपणाकरिता एक चमचा कॉर्नफ्लोअर दुधाला लावावे. नंतर त्यात साखर, बदामाचे काप, पिस्त्याचे काप, बेदाणा आणि तयार करून ठेवलेले रसगुल्ले सोडावेत. एक उकळी आल्यावर खाली उतरवून घ्यावे. गार झाल्यावर डिशमध्ये रसगुल्ल्यांसकट दूध घालून त्यावर साय घालावी व आवडत असल्यास त्यावर गुलाबपाणी शिंपडून खावयास द्यावे. रसमलई जितकी थंड असेल तितकी खावयास चांगली लागते. शक्य असल्यास रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावी.

X

Right Click

No right click