अजि सोनियाचा दिनु - संत ज्ञानेश्वर

Parent Category: मराठी संस्कृती

अजि सोनियाचा दिनु ।
वर्षे अमृताचा घनु ॥१॥

हरि पाहिला रे हरि पाहिला रे ।
सबाह्याभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी ॥२॥

दृढ विटे मन मुळी ।
विराजित वनमाळी ॥३॥

बरवा संतसमागमु ।
प्रगटला आत्मारामु ॥४॥

कृपासिंधु करुणाकरू ।
बाप रखमादेविवरू ॥५॥

X

Right Click

No right click